महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

'बात तो करो', 'खानदानी शफाखाना'चा दुसरा ट्रेलर प्रदर्शित - comedy film

आपल्या पूर्वजांची संपत्ती नावावर करून घेण्यासाठी सोनाक्षीसमोर ६ महिने त्यांचं सेक्स क्लिनीक चालवण्याची वेळ येते. समाजात हा विषय बोलण्यास लोक लाजतात, अशात एक मुलगी सेक्स क्लिनीक चालवते, यावरून तिच्यावर होणारी टीका यात दिसते.

'खानदानी शफाखाना'चा दुसरा ट्रेलर प्रदर्शित

By

Published : Jul 22, 2019, 4:53 PM IST

Updated : Jul 22, 2019, 7:06 PM IST

मुंबई- बॉलिवूडची बिनधास्त गर्ल सोनाक्षी सिन्हा लवकरच 'खानदानी शफाखाना' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विनोद आणि वेगळ्या विषयावर आधारित या सिनेमाचा ट्रेलरही काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. एका गंभीर विषयासोबतच मनोरंजनाचा तडका असणारा हा ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीसही उतरला.

आता चित्रपटाचा दुसरा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. आपल्या पूर्वजांची संपत्ती नावावर करून घेण्यासाठी सोनाक्षीसमोर ६ महिने त्यांचं सेक्स क्लिनीक चालवण्याची वेळ येते. अशात सोनाक्षी कशा प्रकारे या गोष्टी हाताळते आणि यादरम्यान होणारे अनेक विनोदी संवाद यात पाहायला मिळतात.

समाजात हा विषय बोलण्यास लोक लाजतात, अशात एक मुलगी सेक्स क्लिनीक चालवते, यावरून तिच्यावर होणारी टीका यात दिसते. या विषयावर लोकांनी खुलेपणाने बोलावे यासाठी, बात तो करो, असं सोनाक्षी वारंवार म्हणाताना या दुसऱ्या ट्रेलरमध्ये पाहायला मिळते.

चित्रपटाची कथा नेहमीच्या रटाळ प्रेमकथांपेक्षा वेगळी आणि विनोदी असल्यानं प्रेक्षकांना काहीसं वेगळेपण या चित्रपटात पाहायला मिळेल हे नक्की. शिल्पी दासगुप्ता द्वारा दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती भूषण कुमार, दिव्या खोसला कुमार, कृष्ण कुमार, महावीर जैन आणि म्रद्यदीप सिंह लांबा यांनी केली आहे. येत्या २ ऑगस्टला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.

Last Updated : Jul 22, 2019, 7:06 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details