महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

'दूरदर्शन' सिनेमाचा धमाल ट्रेलर रिलीज - Doordarshan Trailer

दूरदर्शन या आगामी चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. माही गिल, मनू ऋषी चढ्ढा, डॉली अहलुवालिया यांच्यासह अनेक दिग्गज कलाकार यात व्यक्तीरेखा साकारत आहे. धमाल कॉमेडी असलेला हा चित्रपट २८ फेब्रुवारीला रिलीज होणार आहे.

Doordarshan Trailer
'दूरदर्शन' सिनेमाचा धमाल ट्रेलर

By

Published : Jan 29, 2020, 3:33 PM IST


मुंबई - निखळ कॉमेडी असलेला दूरदर्शन हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज झालाय. या चित्रपटाचा ट्रेलर पाहून आपण अंदाजकरु शकतो की ही वेगळी हास्ययात्रा भरपूर मनोरंजनाची पर्वणी ठरु शकते. दिग्गज कलाकार यात भूमिका साकारत आहेत.

गगन गिरी यांचे दिग्दर्शन असलेल्या दूरदर्शन सिनेमाची निर्मिती रितु आर्या यांनी केली आहे. यात माही गिल, मनू ऋषी चढ्ढा, डॉली अहलुवालिया, महक मनवाणी आणि शार्दुल राणा यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

या चित्रपटात ९० चे दशक आणि चालू वर्तमान यांच्यातील धमाल घटना पाहायला मिळतील. धमाल कॉमेडी असलेला हा चित्रपट २८ फेब्रुवारीला रिलीज होणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details