'उजडा चमन' या विनोदी चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च करण्यात आला आहे. 'प्यार का पंचनामा' चित्रपटाचे दोन अफलातून भाग बनवणाऱ्या निर्मात्यांकडून या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. अत्यंत चटपटीत संवाद, प्रासंगिक विनोद आणि कलाकारांचे अचूक टायमिंग यामुळे विषय हाताळण्यात चित्रपट नक्कीच यशस्वी होईल याची खात्री ट्रेलर पाहताना येते.
'उजडा चमन' : पाहा, टक्कल पडलेल्या तरुणाच्या लगीन घाईचा ट्रेलर - Ujda Chaman Trailer out now
'उजडा चमन' ही एका टक्कल पडलेल्या ३० वर्षीय चमन कोहली या अविवाहित तरुणाची गोष्ट आहे. हा विनोदी चित्रपट ८ नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च करण्यात आला आहे.
'उजडा चमन' ही एका ३० वर्षीय चमन कोहली या अविवाहित तरुणाची गोष्ट आहे. तो कॉलेजमध्ये लेक्चरर आहे. परंतु, अवेळी आलेल्या केसगळतीच्या समस्येने तो वैतागलाय. सुंदर पत्नीचे स्वप्न पाहणाऱ्या या चमन कोहलीच्या आयुष्यात अचानक एक संकट निर्माण होते. ३१ व्या वाढदिवसाच्या अगोदर जर लग्न झाले नाही तर मुलगा आयुष्यभर अविवाहित राहील अशा प्रकारचे भाकित भविष्यवेत्त्याने वर्तवले आहे. त्यामुळे त्याचे उडालेली धांदल या सिनेमात चित्रीत करण्यात आलीय.
या चित्रपटात सनी सिंग, मानवी गग्रो, करिश्मा शर्मा आणि ऐश्वर्या साकुजा यांच्या प्रमुख भूमिका आहेत. अभिषेक पाठक यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केलंय. ८ नोव्हेंबर रोजी ''उजडा चमन' प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.