महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

मुंबईत मुसळधार पाऊस, पल पल दिल के पासचं ट्रेलर लॉन्च इव्हेंट ढकललं पुढे - जुहू

आज ( बुधवारी) जुहूच्या पीव्हीआरमध्ये या सिनेमाचं ट्रेलर लॉन्च इव्हेंट पार पडणार होतं. मात्र, मुंबईमध्ये सुरु असणाऱ्या मुसळधार पावसामुळे ते पुढे ढकलण्यात आलं आलं आहे. सनी देओलनं याबद्दलची माहिती देणारा एक व्हिडिओ शेअर केला आहे.

पल पल दिल के पासचं ट्रेलर लॉन्च इव्हेंट ढकललं पुढे

By

Published : Sep 4, 2019, 8:03 PM IST

मुंबई- अभिनेता सनी देओलच्या दिग्दर्शनात तयार झालेला पल पल दिल के पास सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमातून सनी देओलचा मुलगा करण देओल बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. तर त्याच्यासोबत साहेर बम्बा ही नवोदित अभिनेत्री झळकणार आहे.

हेही वाचा - गणपती विसर्जन : ढोल ताशांच्या गजरात सलमानसह या कलाकारांनी धरला ठेका

आज ( बुधवारी) जुहूच्या पीव्हीआरमध्ये या सिनेमाचं ट्रेलर लॉन्च इव्हेंट पार पडणार होतं. मात्र, मुंबईमध्ये सुरु असणाऱ्या मुसळधार पावसामुळे ते पुढे ढकलण्यात आलं आहे. आता हे इव्हेंट उद्या म्हणजेच गुरुवारी दुपारी साडेबारा वाजता होणार आहे. सनी देओलनं याबद्दलची माहिती देणारा एक व्हिडिओ शेअर केला आहे.

या व्हिडिओमध्ये सनी सांगत आहे, की मुंबईमध्ये सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे मीडिया या ट्रेलर लॉन्च इव्हेंटमध्ये पोहोचू शकत नाहीये. त्यामुळे हा ट्रेलर गुरुवारी लॉन्च करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. याशिवाय करण आणि साहेर यांनीही एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात ते दोघं म्हणत आहेत, उद्या पाऊस येवो किंवा तुफान ट्रेलर प्रदर्शित होणारच.

हेही वाचा - जोकर सिनेमानं रचला इतिहास, ट्रेलरला आठ मिनिटे मिळाली स्टँडिंग ओव्हेशन

ABOUT THE AUTHOR

...view details