मुंबई- गृहमंत्री अमित शाह यांनी कलम ३७० हटवण्याचा प्रस्ताव राज्यसभेत ठेवला आहे. यासोबतच जम्मू काश्मीरचे विभाजन करण्यात आले असून जम्मू-काश्मीरसह लडाखलाही केंद्रशासित घोषित करण्यात आले आहे. यावर अनेकांच्या संमिश्र प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. कलाकारांनीही ट्विट करत यावर आपली मतं मांडली आहेत.
भारत एक झाला आहे.. आज खऱ्या अर्थानं देशाला पूर्ण स्वातंत्र्य मिळालं - परेश रावल - भारत
गृहमंत्री अमित शाह यांनी कलम ३७० हटवण्याचा प्रस्ताव राज्यसभेत ठेवला आहे. नुकतंच परेश रावल यांनी ट्विट करत या निर्णयाचं समर्थन केलं आहे. भारताला आज खऱ्या अर्थाने आणि पूर्णपण स्वातंत्र्य मिळालं असल्याचं त्यांनी म्हटलं
परेश रावल
नुकतंच परेश रावल यांनी ट्विट करत या निर्णयाचं समर्थन केलं आहे. भारताला आज खऱ्या अर्थाने आणि पूर्णपण स्वातंत्र्य मिळालं असल्याचं त्यांनी म्हटलं. खऱ्या शब्दात सांगायचं झालं, तर आज भारत एक झाला आहे...जय हिंद, असं त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.