मुंबई- अभिनेता-निर्माता तुषार कपूर याने लोकांना आपल्यातच सांता शोधण्याची विनंती केली आहे. लोकांनी त्यांच्या समस्या स्वतःच सोडवाव्यात आणि आजूबाजूच्या लोकांच्या चेहऱ्यावर हास्य आणले पाहिजे असे तुषारला वाटते.
तुषार म्हणतो, "या ख्रिसमसमध्ये, मी फक्त एवढेच सांगत आहे की लोकांनी स्वत: मध्येच सांता शोधला पाहिजे. आपण आपल्या सर्व समस्या स्वतःच सोडवल्या पाहिजेत आणि आपल्या चेहऱ्यावर हास्य राखले पाहिजे. माणसाने कठोर परिश्रम केले पाहिजे, धैर्य बाळगले पाहिजे आणि सर्व समस्यांचा सामना करण्यासाठी तत्पर असले पाहिजे. कधी कधी स्थितीवर आपले नियंत्रण असत नाही, परंतु आनंदीत राहण्याची इच्छा या सर्व अडचणींवर मात करते.''