महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

महाचित्रपट 'सूर्यपुत्र महावीर कर्ण'चा टायटल लोगो झाला अनावरीत ! - डॉ. कुमार विश्वास

सूर्यपुत्र कर्णाला मध्यवर्ती भूमिकेत ठेऊन वाशू भगनानी, दीपशिखा देशमुख आणि जॅकी भगनानी सूर्यपुत्र महावीर कर्ण चित्रपटाची निर्मिती करीत आहेत. हा चित्रपट तांत्रिकदृष्ट्या आंतरराष्ट्रीय पातळीवर असेल तसेच विषयाचे बारकावे आणि अप्रतिम दृष्यमानाता या चित्रपटाची खासियत असेल. भारतीय सिनेमात प्रथमच महाभारताची भव्यता प्रेक्षकांना अनुभवायला मिळेल.

Suryaputra Mahavir Karna
'सूर्यपुत्र महावीर कर्ण

By

Published : Feb 26, 2021, 4:55 PM IST

महाभारतातील सहावा पांडव म्हणजे कर्ण. तो तसा दुर्लक्षितच राहिला. अर्जुनाएवढीच गुणवत्ता असूनही त्याचा उदोउदो कधी झाला नाही. महाभारत हे महाकाव्य अनेकांनी छोट्या आणि मोठ्या पडद्यावर, चितारण्याचा प्रयत्न केला. भारतीयच नव्हे तर आंतरराष्ट्रीय फिल्म मेकर्सनी महाभारत आपापल्यापरीने उभं केले. परंतु कर्णाला पृष्ठभागी ठेऊन कोणतीही कलाकृती झाल्याचे ऐकिवात नाही. आता निर्माते वाशू भगनानी, दीपशिखा देशमुख आणि जॅकी भगनानी यांनी हे 'कर्ण-धनुष्य' उचलण्याचे ठरविले आहे. सूर्यपुत्र कर्णाला मध्यवर्ती भूमिकेत ठेऊन ते सूर्यपुत्र महावीर कर्ण चित्रपटाची निर्मिती करीत आहेत. हा चित्रपट तांत्रिकदृष्ट्या आंतरराष्ट्रीय पातळीवर असेल तसेच विषयाचे बारकावे आणि अप्रतिम दृष्यमानाता या चित्रपटाची खासियत असेल. भारतीय सिनेमात प्रथमच महाभारताची भव्यता प्रेक्षकांना अनुभवायला मिळेल.

'सूर्यपुत्र महावीर कर्ण
हा बहुभाषिक चित्रपट असून याचे लेखन आर एस विमल यांनी केले आहे. पूजा एंटरटेनमेंटचा हा सर्वात महागडा आणि अतिभव्य प्रोजेक्ट असणार आहे. हा चित्रपट कर्णाच्या अनुषंगाने कथाकथन करीत महाभारत उलगडेल. तसेच या शतकातील हा अतिभव्य चित्रपट ठरेल असे सूत्रांनी सूचित केले आहे. प्रसिद्ध कवी डॉ. कुमार विश्वास 'सूर्यपुत्र महावीर कर्ण' या चित्रपटाचे संवाद लिहिणार असून पटकथेतही त्यांचे योगदान असणार आहे. कुमार विश्वास त्यांच्या हिंदी, उर्दू आणि संस्कृत भाषांवरील प्रभुत्वासाठी प्रसिद्ध आहेत. डॉ. विश्वास पहिल्यांदाच एखाद्या चित्रपटाशी जोडले गेले आहेत.'सूर्यपुत्र महावीर कर्ण' हा चित्रपट पंचभाषिक असून हिंदी, तामिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम भाषांमध्ये बनविला जाणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details