महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

तैमूर अली खान झाला मोठा भाऊ! - KAREENA KAPUR KHAN BABY LATEST NEWS

चार वर्षांचा तैमूर अली खान आता दादा बनलाय. त्याला आता एक लहान भाऊ मिळालाय. करीना कपूर खानने अजून एका गोंडस मुलाला जन्म दिला. करीना सैफच्या घरी एका छोट्या नवाबचे आगमन झाले असून बाळ बाळंतीण सुखरूप आहेत.

तैमूर अली खान झाला मोठा भाऊ!
तैमूर अली खान झाला मोठा भाऊ!

By

Published : Feb 21, 2021, 5:29 PM IST

मुंबई -चार वर्षांचा तैमूर अली खान आता दादा बनलाय. त्याला आता एक लहान भाऊ मिळालाय. करीना कपूर खानने अजून एका गोंडस मुलाला जन्म दिला. करीना सैफच्या घरी एका छोट्या नवाबचे आगमन झाले असून बाळ बाळंतीण सुखरूप आहेत. दक्षिण मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात रविवारी सकाळी करीनाची 'डिलिव्हरी' झाली आणि कपूर आणि खान कुटुंबीयांनी पेढे वाटले.

गेल्या वर्षी कोरोना संक्रमणातील लॉकडाऊनमध्ये सैफ आणि करीनाने त्यांच्या घरात नवीन पाहुणा येणार असल्याचे समाज माध्यमावर पोस्ट केले होते व त्यावर अभिनंदनाचा वर्षाव झाला होता. सैफ-करीनाचा पहिला मुलगा तैमूरच्या नावावरून मोठा गदारोळ झाला होता. आता तसे काही होऊ नये असे या दाम्पत्याला नक्कीच वाटत असेल. त्यामुळेच त्यांच्या दुसऱ्या मुलाचे नामकरण काय होते याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

तैमूर अली खान झाला मोठा भाऊ!
फेब्रुवारी महिन्यातील उत्तरार्धात सैफ-करीनाच्या घरी नवीन बाळाचे आगमन होईल असे डॉक्टर्सनी सांगितले होते. 21 फेब्रुवारीला करीनाने दुसऱ्या बाळाला जन्म दिला. करीना, सैफ आणि तैमूर त्यांच्या घरातील नव्या पाहुण्याचे नवीन घरात स्वागत करतील. दोन-तीन दिवसांत करीनाला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळण्याची अपेक्षा आहे. तैमूर सर्वात जास्त खुश आहे कारण त्याला आता खेळायला हक्काचा घरातलाच सवंगडी मिळणार आहे. अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांनी आपल्या मुलीच्या, वामिशाच्या जन्मानंतर पापराझीला विनंती केली होतो की फोटोंसाठी कृपया तिला भणभणून सोडू नका, प्लिज तिला ' नॉर्मल ' जगू द्या. त्याच सुमारास सैफ आणि करिनाने तसेच आवाहन केले होते. कारण पापराजी तैमूरला प्रत्येक ठिकाणी फॉलो करत छायाचित्रे काढत होते. करीना कपूर-खान गरोदरपणातही काम करीत होती. तिच्या मते गरोदरपणात शारीरिकदष्ट्या बिझी राहिल्याने मानसिक संतुलन बिघडत नाही व कामात बिझी असल्याने डोक्यात काळजीयुक्त विचार येत नाहीत. करीनाने प्रेगनन्सीच्या पहिल्या तिमाहीत आमिर खानच्या लाल सिंह चढ्ढाचे चित्रीकरण पूर्ण केले तसेच ती काही जाहिरातींच्या शूटिंगमध्ये व्यस्त होती. तिचा रेडिओ शो ' व्हॉट वुमेन वॉन्ट ' सुद्धा लोकप्रिय आहे. ती तिच्या गर्ल गँगसोबत वेगवेगळ्या व्यंजनांची गोडी चाखत होती. तर योगा करत शारीरिक व मानसिक संतुलन सांभाळत होती. काही दिवसांपूर्वीच तिने आपले वडील रणधीर कपूर यांच्या बर्थडेच्या पार्टीला हजेरी लावली होती. सारा अली खानसुद्धा आपल्या भावाच्या आगमनाने खुश आहे. सैफ आता चार अपत्यांचा बाप झाला असून नवीन बाळासाठी तो सुट्टीवर असून त्याच्या संगोपनात हातभार लावणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details