मुंबई - अभिनेता टायगर श्रॉफ आपल्या फिटनेस आणि उत्तम शरीरयष्टीसाठी ओळखला जातो. त्याचे आश्चर्यकारक स्टंट्स व त्याच्या सुंदर व्यक्तिमत्त्वाचे कौतुक करताना चाहते थकत नाहीत. टायगर सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांसोबत व्यायाम करत असतानाचे फोटो किंवा व्हिडिओ शेअर करण्यासाठी विसरत नाही. ज्यामुळे तो नेहमीच चर्चेत असतो. यावेळी टायगरने आपला वर्कआउट व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये तो स्टंट करताना दिसत आहे. टायगरच्या या स्टंटने करोडो लोकांची मने जिंकली आहेत.
व्हिडिओमध्ये टायगर एअर किक करताना दिसला आहे. चाहत्यांसह सेलिब्रिटींनी त्याच्या या व्हिडिओवर भरपूर कॉमेंट्स केल्या आहेत. टायगरच्या या व्हिडिओवर राहुल देव, अरमान मलिक, रोनित रॉय, बिंदू दारा सिंग, सोफी चौधरी, रेमो डिसूझा आणि दिशा पाटनीची बहीण खुशबू पाटनी यांनीही त्याचे जोरदार कौतुक केले आहे. खुशबूने यावर कॉमेंट केली आणि लिहिलंय "गोकू सायन लुक". या व्हिडिओला सोशल मीडियावर भरपूर प्रतिसाद मिळत असून आत्तापर्यंत या व्हिडिओ पाच कोटी पाच लाख व्यूव्ह्ज मिळाले आहेत. अशा प्रकारे टायगरचे कौतुक करताना चाहते थकलेले नाहीत.