मुंबई- 2020 हे वर्ष सिनेसृष्टीसाठी अनेक कारणांनी कठीण ठरले. या वर्षात काही चित्रपट हिट ठरले तर, काही अपयशी ठरले. मात्र, वर्षाच्या सुरुवातीच्या महिन्यात आलेला टायगर श्रॉफची भूमिका असलेला 'बागी 3' सिनेमा 2020 सालचा सर्वात मोठा ओपनर सिनेमा ठरला आहे. या सिनेमाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. मात्र, अचानक कोरोना संकटामुळे चित्रपटगृहे बंद करण्यात आली. तरीही चित्रपटाने जगभरात 135.08 कोटीचा बिझनेस केला. शेवटच्या दिवशीदेखील चित्रपटाने 6.5 कोटीचे कलेक्शन केले.
लॉकडाऊनचा टायगर श्रॉफला फायदा, 'बागी 3' ठरला यंदाचा सर्वाधिक यशस्वी सिनेमा - लॉकडाऊनचा टायगर श्रॉफला फायदा
लॉकडाऊन नसते तर चित्रपट बॉक्स ऑफिसवर यापेक्षा अधिक दमदार कमाई करण्यात यशस्वी ठरला असता. 'बागी 3' ने प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर 17.50 कोटीची कमाई केली होती. या वर्षात प्रदर्शित झालेल्या बॉलिवूड सिनेमांमध्ये हा सर्वाधिक ओपनिंग डे कलेक्शन करणारा सिनेमा ठरला.

टायगर श्रॉफने नेहमीच धमाकेदार अंदाजात अॅक्शन दृश्य सादर केली आहेत आणि बागी फ्रैंचाइसी याचा पुरावा आहे. 'जगाचा सर्वात कमी वयाचा अॅक्शन स्टार' आपल्या या चित्रपटाच्या यशाचा आनंद घेतो आहे. सोबतच आगामी हिरोपंती 2 सिनेमाच्या चित्रीकरणाच्याही तो तयारीला लागला आहे. हा सिनेमा 16 जुलै 2021 ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.