मुंबई - टायगर श्रॉफ आणि श्रध्दा कपूर हे सध्या 'बागी ३' च्या घोषणेनंतर खूप चर्चेत आहे. सिनेमाच्या ट्रेलरलाही खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. आता नवीन गोष्ट ही आहे की सिनेमाचे 'दस बहाने २.0' हे गाणे लवकरच रिलीज होणार आहे.
मंगळवारी टायगरने गाण्याचे पोस्टर ट्विट केले आहे. यात टायगर आणि श्रध्दा दिसत आहेत.
पोस्टरच्या कॅप्शनमध्ये टायगरने लिहिलंय, ''हा बागी खूप बदमाश आहे आणि त्याचे पार्टी जाम गाणेही. #दसबहाने२.०
हे गाणे गायक केके आणि शान यांनी गायलेल्या 'दस बहाने करके ले गइ दिल'चे रिक्रिएशन आहे.
अमजद खान यांनी 'बागी ३' चे दिग्दर्शन केले आहे. यात टायगर पुन्हा एकदा अॅक्शन मुडमध्ये दिसणार आहे. यात रितेश देशमुख आणि अंकिता लोखंडे महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.