महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

Tiger Shroff Injured : 'गणपथ'च्या शुटिंग दरम्यान टायगर श्रॉफ जखमी, डोळा थोडक्यात बचावला - Ganpath Shooting in London

टायगर श्रॉफ ( Tiger Shroff ) गेल्या अनेक दिवसांपासून 'गणपथ' चित्रपटाच्या शूटिंगसाठी यूकेमध्ये ( Ganpath Shooting in London ) आहे. टायगर आपल्या चित्रपटाशी संबंधित अॅक्शन सीन्स आणि लोकेशन्स अनेकदा सोशल मीडियावर शेअर करत असतो. पण मंगळवारी रात्री टायगरने त्याच्या इन्स्टास्टोरीवर एक जखमी असलेला स्वतःचा ( Tiger Shroff Injured ) फोटो शेअर केला.

टायगर श्रॉफचा इन्स्टाग्रावरील फोटो
टायगर श्रॉफचा इन्स्टाग्रावरील फोटो

By

Published : Dec 22, 2021, 7:54 PM IST

मुंबई- बॉलिवूडचा सुपरहिरो टायगर श्रॉफच्या ( Tiger Shroff ) चाहत्यांसाठी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. टायगर जखमी ( Tiger Shroff Injured in London ) झाला आहे. 'गणपथ' चित्रपटाचे शूटिंग करत असताना त्याच्या डोळ्याला दुखापत ( Injury to Tiger Eye ) झाली. सुदैवाने हा अपघात फार मोठा नव्हता, अन्यथा त्याचा फटका टायगरला सहन करावा लागला असता. टायगरने त्याच्या दुखापतीबद्दलचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

टायगर श्रॉफने डोळ्याला जखम झाल्यानंतर शेअर केलेला फोटो

टायगर गेल्या अनेक दिवसांपासून 'गणपथ' चित्रपटाच्या शूटिंगसाठी ब्रिटनमध्ये आहे. टायगर आपल्या चित्रपटाशी संबंधित अॅक्शन सीन्स आणि लोकेशन्स इथून अनेकदा शेअर करत असतो. पण मंगळवारी रात्री, अभिनेत्याने त्याच्या इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला, ज्यामध्ये अभिनेत्याचा जखमी डोळा पाहून चाहते अवाक झाले.

या सेल्फीसोबत अभिनेत्याने कॅप्शनही लिहिले आहे, 'Happens #Ganpat Final Countdown', या सेल्फीसोबत अभिनेत्याने हॉट फेस आणि निन्जा इमोजी देखील शेअर केला आहेत. यात टायगरचा डावा डोळा लाल झाल्याचे फोटोत दिसत आहे.

त्यापूर्वी टायगरने 'कभी खुशी कभी गम' चित्रपटाला 20 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर त्याचा रोल मॉडेल हृतिक रोशनच्या 'यू आर माय सोनिया' या सुपरहिट गाण्यावर डान्स करत व्हिडिओ शेअर केला होता.

'गणपथ' चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर, या चित्रपटात क्रिती सेनन या टायगरसोबत दिसणार आहे. 2014 मध्ये टायगर आणि क्रितीने 'हिरोपंती' या चित्रपटातून पदार्पण केले होते. 'हिरोपंती' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती.

हेही वाचा -Nora Fatehi Prosecution Witness : नोरा फतेही ठग सुकेश चंद्रशेखर विरुद्ध होणार फिर्यादी साक्षीदार

ABOUT THE AUTHOR

...view details