महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

'स्टूडंट ऑफ द ईअर २'चा ट्रेलर ट्रोल, चित्रपटातील कलाकारांच्या आल्या प्रतिक्रिया - tara sutariya

हा ट्रेलर पाहता चित्रपटाचा वास्तविक जीवनाशी काहीही संबंध वाटत नसल्याचे अनेकांनी म्हटले. तर आम्हाला शाळेत कधीही असे कपडे घालायला मिळाले नसल्याचेही अनेकांनी म्हटले.

'स्टूडंट ऑफ द ईअर २'चा ट्रेलर ट्रोल

By

Published : Apr 20, 2019, 9:27 AM IST

मुंबई- 'स्टुडंट ऑफ द ईअर' चित्रपटाच्या पहिला भागाला मिळालेल्या यशानंतर चित्रपटाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दुसऱ्या भागात अनन्या पांडे, टायगर श्रॉफ आणि तारा सुतारिया हे त्रिकूट मुख्य भूमिकेत असणार आहे. काही दिवसांपूर्वीच चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला. हा ट्रेलर पाहून प्रेक्षकांनी कलाकारांना चांगलंच ट्रोल केलं.

हा ट्रेलर पाहता चित्रपटाचा वास्तविक जीवनाशी काहीही संबंध वाटत नसल्याचे अनेकांनी म्हटले. तर आम्हाला शाळेत कधीही असे कपडे घालायला मिळाले नसल्याचेही अनेकांनी म्हटले. यावर उत्तर देत अनन्याने म्हटलं आहे, की हा एक काल्पनिक चित्रपट आहे. अशी स्कूल लाईफ आम्हीही कधी जगलो नाही, त्यामुळे याला केवळ एक काल्पनिक कथा म्हणून पाहा.

तर दुसरीकडे टायगर श्रॉफनेही यावर प्रतिक्रिया देत, हा चित्रपट केवळ मनोरंजनासाठी बनवला गेला असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे हा चित्रपट पाहायला येताना आपले हे विचार घरीच ठेवून या, असा सल्लाही टायगरने प्रेक्षकांना दिला आहे. मे महिन्यात १० तारखेला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details