मुंबई- बॉलिवूडमध्ये आपल्या खास डान्सने आणि अॅक्शन सीनमुळे प्रसिद्ध असलेला हृतिक रोशन गेल्या काही दिवसांपासून 'सुपर ३०' चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे. तर या चित्रपटाला मिळालेल्या यशानंतर हृतिक आता लवकरच 'वॉर' या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
हृतिक म्हणतोय, टायगर माझी प्रेरणा झाला आहे - आठवण
हृतिकचा सर्वात मोठा चाहता असलेला टायगर अनेकदा मुलाखतीदरम्यान बोलताना हृतिक आपली प्रेरणा असल्याचे सांगत असतो, आता खुद्द हृतिकनेही टायगर आपली प्रेरणा असल्याचे म्हटलं आहे.
या चित्रपटात हृतिकसोबत अॅक्शन स्टार टायगर श्रॉफही मुख्य भूमिकेत झळकणार आहे. हृतिकचा सर्वात मोठा चाहता असलेला टायगर अनेकदा मुलाखतीदरम्यान बोलताना हृतिक आपली प्रेरणा असल्याचे सांगत असतो, आता खुद्द हृतिकनेही टायगर आपली प्रेरणा असल्याचे म्हटलं आहे.
हृतिक म्हणाला, मी स्वतःला भाग्यवान समजतो, की मी एका अशा व्यक्तीसाठी प्रेरणा आहे, जो आज माझी प्रेरणा बनला आहे. त्याच्यासोबतचा कामाचा अनुभन खूप चांगला होता. त्याने मला आठवण करून दिली की मी किती मेहनत करायचो. यासोबतच टायगर अगदी आपल्या वडिलांप्रमाणे म्हणजेच जॅकी श्रॉफ यांच्याप्रमाणेच शांत, कामाप्रती प्रामाणिक आणि उत्तम अभिनेता असल्याचेही हृतिक म्हणाला.