मुंबई- गेल्या अनेक दिवसांपासून अभिनेता टायगर श्रॉफ आणि दिशा पटानी यांच्या रिलेशनशिपविषयीच्या चर्चा सुरु आहेत. हे दोघे अनेकदा एकमेकांसोबत स्पॉटदेखील झाले आहेत. मात्र, रिलेशनशिपबद्दलचं वृत्त दोघांनीही नेहमीच फेटाळलं. अशात आता त्यांच्या रिलेशनशिपबद्दल टायगरच्या बहिणीनं खुलासा केला आहे.
टायगरच्या रिलेशनशिपबद्दल बहिणीने केला खुलासा; म्हणाली, मी कधी खोटं बोलत नाही - टायगरची बहिण
टायगरची बहिण क्रिश्ना श्रॉफच्या म्हणण्यानुसार, टायगर सध्या १०० टक्के सिंगल आहे. नुकतीच तिनं एका चॅट शोमध्ये हजेरी लावली होती. यावेळी तिला तिच्या रिलेशनशिप स्टेट्सबद्दल विचारण्यात आलं.
टायगरची बहिण क्रिश्ना श्रॉफच्या म्हणण्यानुसार, टायगर सध्या १०० टक्के सिंगल आहे. नुकतीच तिनं एका चॅट शोमध्ये हजेरी लावली होती. यावेळी तिला तिच्या रिलेशनशिप स्टेट्सबद्दल विचारण्यात आलं. यावर ती म्हणाली, मला हेच समजत नाही, की लोक रिलेशनशिपविषयी का लपवतात. माझा जोडीदार असणाऱ्या व्यक्तीचा मला अभिमान आहे, त्यामुळे यामध्ये लपवण्यासारखं मला काहीच वाटतं नसल्याचं तिनं स्पष्ट केलं.
यासोबतचं टायगरबद्दल बोलताना ती म्हणाली, तुम्हाला माहिती आहे, याबाबतीत मी खोटं बोलणार नाही. टायगर पूर्णपणे सिंगल आहे. दरम्यान बॉलिवूडचा अॅक्शन स्टार टायगर लवकरच 'वॉर' सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यात तो हृतिक रोशनसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.