मुंबई- बॉलिवूड स्टार सलमान खान आणि कॅरिना कैफ सध्या ऑस्ट्रियामध्ये आहेत. त्यांच्या आगामी स्पाय थ्रिलर 'टायगर ३' साठी अॅक्शन सीन्सचे शुटिंग ते येथे करणार आहेत. या सिनेमात भरपूर स्टंट्स पाहायला मिळणार असून अप्पर ऑस्ट्रिया, साल्झकॅमेरगुट, डाचस्टीन साल्झकॅमेरगुट आणि शेवटी व्हिएन्ना येथे काही असाधारण अॅक्शन स्टंट ते करताना दिसतील.
ऑस्ट्रियाचे अनोखे दर्शन घडवणार टायगर 3
ऑस्ट्रियामधील एका सूत्राने सांगितले: "टायगर 3 चित्रपटामध्ये ऑस्ट्रियाला यापूर्वी कधीही प्रझेन्ट केले नाही या प्रकारे चित्रीत केले जाणार आहे. यशराज फिल्म्सने नेत्रदिपकपणे ही दृष्ये चित्रीत करायचे ठरवले आहे. या देशातील अनोख्या ठिकाणी सलमान आणि कॅटरिनाचे शुटिंग पार पडणार आहे. ही अशी ठिकाणे आहेत की जी स्थानिक नागरिकांच्याही फारशा परिचयाची नाहीत. सध्या अप्पर ऑस्ट्रिया, साल्झकॅमेरगुट, डाचस्टीन साल्झकॅमेरगट यासारख्या भागात शूटिंग करत आहेत जिथे ते चित्रपटासाठी काही अॅक्शन सीन शूट करत आहेत. "
चित्रपटाचे दिग्दर्शक मनीष शर्मा यांची 'टायगर 3' साठी एक भव्य अॅक्शन प्लॅन तयार केलाय. टायगर आणि झोया ऑस्ट्रिया देशाच्या पार्श्वभूमीवर आपल्या मिशनला साकाराताना दिसतील, असे सूत्राने सांगितले.
कॅटरिनाने शेअर केला ऑस्ट्रियामधील व्हिडिओ