पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi)यांनी तीन कृषी कायदे रद्द करण्याचा निर्णय(Decision to repeal three agricultural laws) आज जाहीर केल्यानंतर सर्व थरातून प्रतिक्रिया उमटत आहेत. हिंदी सिनेसृष्टीतही शेतकरी आंदोलनाच्या बाजूने आणि विरोधात दोन गट पडले होते. बॉलिवूड सेलेब्रिटींचा (Bollywood celebrities) एक गट या आंदोलनाला विरोध करीत होता तर एक गट समर्थन. अभिनेत्री कंगना रणौतला (Kangana Ranaut) पंतप्रधानांचा हा निर्णय काही पटलेला नाही. तिने सोशल मीडियावरुन आपली खंत व्यक्तही केली आहे. तर अभिनेता सोनू सूद (Sonu Sood ) , प्रकाश राज (Prakash Raj ) , अभिनेत्री तापसी पन्नू (actress Tapsi Pannu), स्वरा भास्कर (Swara Bhaskar)यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.
अभिनेता सोनू सूद मूळचा पंजाब राज्यातील रहिवासी आहे. त्यामुळे सुरुवातीपासून शेतकरी आंदोोलनाच्या समर्थनार्थ तो होता. आज पंतप्रधानांनी कायदे रद्द करण्याचा निर्णय घेतल्याने सोनूलाही आनंद झालाय. त्याने नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत.
अभिनेता सोनू सूदने आपल्या ट्विटमध्ये लिहिलंय, "शेतकरी पुन्हा आपल्या पिकात परततील,
देशातील शेती पुन्हा बहरेल.