मुंबई- अनुराग कश्यपद्वारा दिग्दर्शित 'गँग्स ऑफ वासेपुर' चित्रपटाला काही दिवसांपूर्वीच ७ वर्ष पूर्ण झाले आहेत. अनुराग कश्यपच्या या चित्रपटानं अनेक कलाकारांना प्रसिद्धी मिळवून दिली. बॉक्स ऑफिस गाजवलेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांची तुफान पसंतीही मिळाली. मात्र, या चित्रपटामुळे आपलं करिअर संपल्याची भीती रिचा चड्ढाला वाटत होती.
'गँग्स ऑफ वासेपुर'नंतर असं वाटलं, माझं करिअरचं संपलं - रिचा चड्ढा - Gangs Of Wasseypur
बॉक्स ऑफिस गाजवलेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांची तुफान पसंतीही मिळाली. मात्र, या चित्रपटामुळे आपलं करिअर संपल्याची भीती रिचा चड्ढाला वाटत होती. रिचानं स्वतःच याबद्दल खुलासा केला आहे.
!['गँग्स ऑफ वासेपुर'नंतर असं वाटलं, माझं करिअरचं संपलं - रिचा चड्ढा](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-3647205-thumbnail-3x2-richa.jpg)
रिचानं स्वतःच याबद्दल खुलासा केला आहे. आता अशा सुपरहिट चित्रपटात काम करून कोणाचं करिअर कसं धोक्यात येऊ शकतं, असाच प्रश्न तुम्हालाही पडला असेल. तर याच कारण आहे चित्रपटातील रिचानं साकारलेला रोल. या सिनेमात तिनं सरदार खानची पत्नी नगमाचं पात्र साकारलं होतं.
यानंतर रिचाला बहुतेक चित्रपटांत आईच्या रोलसाठीच विचारणा करण्यात येत होती. २५ वर्षाच्या वयामध्ये मला आईचे रोल देऊ नका, मी इतर रोलही उत्तम पद्धतीने साकारू शकते, हे निर्मात्यांना पटवून देण्यासाठी आपल्याला प्रचंड मेहनत घ्यावी लागली असल्याचे तिनं म्हटलं आहे. त्यामुळे, या चित्रपटानंतर आपलं करिअरचं संपलं असल्याचं काही काळ वाटलं, असं रिचानं म्हटलं आहे.