मुंबई - काही दिवसांपूर्वीच 'हाऊसफुल्ल ४' चित्रपटाची स्टार कास्ट काय असेल याचा उलगडा झाला होता. मात्र हे कलाकार नेमक्या कोणत्या भूमिका साकारणार आहेत याबद्दलची उत्सुकता वाढली होती. आता यावरचाही पडदा उघडला जातोय. अक्षय कुमार आणि रितेश देशमुख यांच्या व्यक्तीरेखा असलेले पोस्टर प्रसिध्द करण्यात आलंय.
या चित्रपटात अक्षय कुमार, रितेश देशमुख, बॉबी देओल, क्रिती सॅनॉन, पूजा हेगडे अशी एकापेक्षा एक तगडी स्टारकास्ट असलेला हाऊसफुल ४ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अशात आता इतर कलाकारांच्या व्यक्तीरेखा कोणत्या असतील याच्या प्रतीक्षा आहेत.
'हाऊसफुल्ल ४'मध्ये अक्षय कुमार बाला आणि हॅरी ही व्यक्तीरेखा साकारतोय. बाला, शैतान का साला असे एका पोस्टरवर लिहिण्यात आलंय. दुसऱ्या पोस्टरमध्ये हॅरीच्या चोहऱ्यावर फोटो फ्रेममधील बाला हात ठेवताना दिसतोय.