महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

कमल हसनच्या 'विक्रम'ची रिलीज डेटची प्रतीक्षा संपली - Action Entertainer Vikram

कमल हसनचा अॅक्शन एंटरटेनर चित्रपट 'विक्रम' रिलीज डेटची अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे. कमल हासन आणि आर. महेंद्रन निर्मित या चित्रपटाकडून लोकांना मोठ्या अपेक्षा आहेत.

विक्रम'ची रिलीज डेट
विक्रम'ची रिलीज डेट

By

Published : Mar 3, 2022, 4:17 PM IST

चेन्नई - दिग्दर्शक लोकेश कनागराज यांच्या बहुप्रतिक्षित अॅक्शन एंटरटेनर 'विक्रम'च्या रिलीजच्या तारखेची अधिकृत घोषणा 14 मार्च रोजी होणार आहे. कमल हासन आणि आर. महेंद्रन निर्मित या चित्रपटाकडून लोकांना मोठ्या अपेक्षा आहेत.

चित्रपटाचे मुख्य शूटिंग ऑगस्ट 2021 मध्ये लॉकडाउन निर्बंध आणि नवीन व्हेरियंटच्या काळात पार पडले. सर्व आवश्यक प्रोटोकॉलचे पालन करून क्रूने अथक परिश्रम केले आणि शेवटी चित्रपटाचे शूटिंग पूर्ण करण्यात यश मिळविले.

चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाल्यानंतर चित्रपटाची निर्मिती करणाऱ्या राजकमल फिल्म्स इंटरनॅशनल या प्रॉडक्शन हाऊसने 14 मार्च रोजी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.

या चित्रपटात नारायण, चेंबन विनोद, कालिदास जयराम आणि गायत्री यांच्याही प्रमुख भूमिका आहेत आणि हा वर्षातील सर्वात आतुरतेने वाट पाहत असलेल्या चित्रपटांपैकी एक आहे. विक्रमचा फर्स्ट लूक रिलीज झाल्यानंतर एका तासापेक्षा कमी वेळात एक कोटीपेक्षा जास्त वेळा पाहिला गेला.

फर्स्ट लूकचा व्हिडिओ चित्रपटातील एक रोमांचक अॅक्शन सीक्वेन्स दाखवतो, ज्यामध्ये कमल हासन तुरुंगात गोळ्यांपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी मेटल शील्ड वापरताना दिसत आहे.

हेही वाचा -Kgf चॅप्टर 2 चा ट्रेलर 27 मार्च 2022 रोजी होणार रिलीज

ABOUT THE AUTHOR

...view details