भारतात असंख्य लोकनृत्ये लोकप्रिय आहेत. यापैकीच एक डान्स म्हणजे भांगडा. प्रत्येक पंजाबी फॅमिलीमध्ये या डान्सला अनन्य साधारण महत्त्व आहे. कोणताही आनंदाचा प्रसंग असो पंजाबी लोक याच भांगड्यावर वेडे होऊन नाचतात.
हिंदी सिनेमानेही भांगड्याला खूप लोकप्रियता मिळवून दिली आहे. हा डान्स आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचवण्याचा प्रयत्न असलेला 'भांगडा पा ले या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस आणण्यात आला आहे. 'उरी - द सर्जिकल स्ट्राक' या यशस्वी चित्रपटानंतर रॉनी स्कूवाला यांच्या आरएसव्हीपी या निर्मिती संस्थेने 'भांगडा पा ले'ची निर्मिती केली आहे.