मुंबई - 'सेक्शन ३७५' सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. या सिनेमात रिचा चड्ढा आणि अक्षय खन्ना मुख्य भूमिकेत असून या सिनेमात ते वकिलाची भूमिका साकारणार आहेत. या सिनेमाचं कथानक भारतीय दंड संहितेच्या कलम ३७५ वर भाष्य करणारं आहे.
समाजातील गंभीर वास्तवावर भाष्य करणाऱ्या 'सेक्शन ३७५'चा टीझर प्रदर्शित - अजय बहल
कलम ३७५ ला बलात्कार विरोधी कायदा म्हणून ओळखलं जातं. या ट्रेलरच्या सुरूवातीलाच, असे शब्द कानावर पडतात, की भारतात प्रत्येक वीस मिनीटाला एका महिलेवर बलात्कार होतो. मात्र, यातील बहुतेक आरोपी हा गुन्हा करूनही शिक्षा न भोगताच मुक्त होतात.
कलम ३७५ ला बलात्कार विरोधी कायदा म्हणून ओळखलं जातं. या ट्रेलरच्या सुरूवातीलाच, असे शब्द कानावर पडतात, की भारतात प्रत्येक वीस मिनीटाला एका महिलेवर बलात्कार होतो. मात्र, यातील बहुतेक आरोपी हा गुन्हा करूनही शिक्षा न भोगताच मुक्त होतात. रिचा या ट्रेलरमध्ये या परिस्थितीविरोधी लढताना दिसते तर दुसरीकडे अक्षय खन्ना तिला विरोध करताना दिसतो.
या चित्रपटाचं दिग्दर्शन अजय बहल यांनी केलं आहे. तर कुमार मांगट पाठक आणि अभिषेक पाठक यांची निर्मिती आहे. सद्य परिस्थितीवर आधारित आणि एका गंभाीर विषयावर भाष्य करणारा हा चित्रपट येत्या १३ सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास सज्ज झाला आहे.