महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

'मेड इन चायना'च्या 'जुगाड कॉमेडी'चा ट्रेलर आला भेटीला - The team of Made In China

'मेड इन चायना'चा अफलातून कॉमेडी असलेला ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. येत्या दिवाळीत २५ ऑक्टोबरला हा सिनेमा रिलीज होईल.

मेड इन चायना' चित्रपटाचा धमाल ट्रेलर

By

Published : Sep 18, 2019, 4:21 PM IST


मुंबई - 'मेड इन चायना' चित्रपटाचा धमाल ट्रेलर प्रदर्शित झालाय. राजकुमार राव, परेश रावल आणि बोमन इराणी अत्यंत इरसाल भूमिकेत दिसत आहेत. मौनी राय, सुमित व्यास, अमायरा दस्तूर, मनोज जोशी आणि गिरीजा राव यांच्या या सिनेमात धमाल व्यक्तीरेखा आहेत.

अपयशी गुजराती व्यावसायिक रघु मेहता ( राजकुमार राव )आणि त्याची पत्नी रुक्मिणी ( मौनी राय ) यांची सिनेमात अत्यंत मस्त केमेस्ट्री पाहायला मिळणार आहे. रघु कसा यशस्वी उद्योजक होतो, तो कोणता जुगाड उद्योग करतो याची मजेशीर चित्रण ट्रेलरमध्ये पाहायला मिळते.

मिखील मुसळे यांनी 'मेड इन चायना'चे दिग्दर्शन केले आहे. दिनेश विजान यांची निर्मिती असलेला हा चित्रपट येत्या दिवाळीत २५ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details