मुंबई- अभिनेत्री प्रियांका चोप्रा गेल्या काही दिवसांपासून आपल्या 'द स्काय इज पिंक' चित्रपटामुळे चर्चेत आहेत. तिचे चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. अशात आता या सिनेमाचा फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात आला आहे. टोरंटो इंटरनेशनल फिल्म फेस्टिवलने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा लूक शेअर केला आहे.
प्रियांकाच्या 'द स्काय इज पिंक'चा फर्स्ट लूक, चित्रपट या दिवशी होणार रिलीज - the sky is pink first poster
प्रियांकाच्या या चित्रपटाचा यावर्षीच्या टोरंट फिल्म फेस्टिवलमध्ये प्रीमीयर होणार आहे. या चित्रपटात प्रियांकाशिवाय फरहान अख्तर आणि जाहीरा वसीम हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार असून सिनेमाच्या पोस्टरमध्ये या सर्वच कलाकारांचे पाठमोरे लूक पाहायला मिळत आहेत
प्रियांकाच्या या चित्रपटाचा यावर्षीच्या टोरंट फिल्म फेस्टिवलमध्ये प्रीमीयर होणार आहे. या चित्रपटात प्रियांकाशिवाय फरहान अख्तर आणि जाहीरा वसीम हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार असून सिनेमाच्या पोस्टरमध्ये या सर्वच कलाकारांचे पाठमोरे लूक पाहायला मिळत आहेत. हे कलाकार समुद्र किनाऱ्यावरून सूर्यास्त होताना बदललेल्या आकाशाच्या रंगाकडे पाहत आहेत.
सोनाली बोस यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं असून आरएसव्हीपी आणि रॉय कपूर फिल्मस यांची निर्मिती असणार आहे. हा चित्रपट भारतात येत्या ११ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे.