मुंबई - सुपरस्टार अक्षय कुमारच्या आगामी हेरगिरी थ्रिलर 'बेल बॉटम'च्या शूटिंगला ऑगस्ट महिन्यात सुरूवात होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार बेल बॉटम सिनेमाच्या शूटींगसाठी अक्षय लंडनला रवाना होणार आहे. अनेक दिग्दर्शक आणि निर्माते शासनाच्या नियमांच्या अधीन राहात चित्रीकरण करण्यासंबंधी योजना आखत आहेत. अशात बॉलिवूडचा खिलाडी आणि त्याची टीम चित्रीकरणासाठी सज्ज झाली आहे.
ही माहिती ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी ट्विट करुन दिली आहे. लॉकडाऊननंतर परदेशातून जाऊन शूट होणारा हा पहिलाच सिनेमा ठरेल. या चित्रपटात अक्षय कुमार, वाणी कपूर, हुमा कुरेशी आणि लारा दत्ता यांच्या प्रमुख भूमिका आहेत. अक्षयसोबत वाणीचा हा पहिला चित्रपट असेल.