मुंबई - गेल्या वर्षीच्या कोरोना परिस्थितीवर मात करतोय असे वाटत असतानाच त्या विषाणूने पुन्हा एकदा डोके वर काढलेय. या वर्षीच्या सुरुवातीला मनोरंजनसृष्टीला हुरूप आला होता आणि शुटिंग्स आणि चित्रपट प्रदर्शन मार्गी लागले असे वाटत होते. गेल्या वर्षी ओटीटी प्लॅटफॉर्मची साथ धरणाऱ्या चित्रपटसृष्टीने यावर्षी अनेक सिनेमे चित्रपटगृहांत प्रदर्शित करण्याची जोरदार तयारी सुरु केली होती. काही चित्रपट थियेटरमध्ये रिलीजही झाले व काही प्रदर्शनाच्या मार्गावर होते. परंतु पुन्हा आलेली कोरोना लाट, खासकरून मुंबईत, चित्रपटसृष्टीसाठी कर्दनकाळ ठरतेय.
कोरोना-परिस्थिती चिघळल्यामुळे ‘चेहरे’चे प्रदर्शन लांबले! - Amitabh Bachchan latest news
अमिताभ बच्चन आणि इमरान हाश्मी अभिनीत बहुप्रतीक्षित रहस्यमय थ्रीलर चित्रपट ‘चेहरे’ने आपले प्रदर्शन पुढे ढकलले आहे. हा चित्रपट येत्या ९ एप्रिलला चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार होता. सध्या देशभर पुन्हा एकदा सुरू झालेल्या कोरोनाच्या उद्रेकामुळे हा निर्णय घेण्यात आलाय.
अमिताभ बच्चन आणि इमरान हाश्मी