मुंबई - मनोरंजनसृष्टीने खडतर २०२० बघितल्यानंतर हे वर्ष व्यावसायिकदृष्ट्या चांगले जाईल असे वाटत होते. वर्षाच्या सुरुवातीपासूनच सिनेमा-शूट्स आणि चित्रपट-प्रदर्शन यांची कॅलेंडर्स बनत होती. परंतु नियतीला वेगळेच मान्य होते. गेल्या काही आठवड्यांपासून कोव्हीड-१९ च्या केसेस मध्ये लक्षणीय वाढ झाली असून पुन्हा लॉकडाऊनला सामोरे जावं लागतंय की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. नाईट कर्फ्यू तर सुरु झालाय आणि साहजिकच चित्रपटसृष्टीतील गतिविधींवर अंकुश लागला आहे. या परिस्थितीत चित्रपटगृहांमध्ये जाणे धोकादायक झाले असल्याकारणाने अनेकांना मजबुरीने चित्रपट प्रदर्शन पुढे ढकलावे लागले. कोव्हीड-१९ च्या दुसऱ्या टप्प्यातील पहिला बळी ठरला आहे ‘हाथी मेरे साथी’.
कोव्हीड-१९ च्या दुसऱ्या टप्प्यातील पहिला बळी, ‘हाथी मेरे साथी’! - ‘हाथी मेरे साथी’च्या रिलीजची तारीख बदलली
गेल्या काही आठवड्यांपासून कोव्हीड-१९ च्या केसेस मध्ये लक्षणीय वाढ झाली असून पुन्हा लॉकडाऊनला सामोरे जावं लागतंय की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे ‘हाथी मेरे साथी’ चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले आहे. यावर्षी ‘हाथी मेरे साथी’ २६ मार्च ला चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार होता.
‘हाथी मेरे साथी