अजय देवगण दिग्दर्शित व अमिताभ बच्चन अभिनित ‘मे डे’ या चित्रपटाबद्दल बरीच उत्सुकता आहे. परंतु अजय देवगणने आता ते नाव बदलून चित्रपटाचे नवीन नामकरण केले आहे ‘रनवे ३४’. त्याने समाज माध्यमांवर संदेश पोस्ट केला, ‘नाट्यमय थरारांना नव्या उंचीवर नेणारा चित्रपट! अजय देवगण निर्मित आणि दिग्दर्शित एक अतिशय रोमांचकारी नाट्य. #Runway34 साठी तयार रहा - ईद रोजी लँडिंग, एप्रिल 29, 2022!‘
तसेच अजय देवगण ने त्याच्या चाहत्यांसाठी तसेच प्रेक्षकांसाठी एक खास पत्रही लिहिले आहे. ....
“प्रिय मित्रानो,
रनवे ३४ हा सत्य घटनांनी प्रेरित चित्रपट आहे. या चित्रपटाच्या पोस्टरसह मी रिलीजची तारीख आणि नवीन शीर्षक अनावरण करत असताना आज मला तुमच्यासोबत आणखी काही तपशील शेअर करण्याची गरज वाटत आहे. या चित्रपटाच्या कथेबद्दल अधिक काहीच प्रकट न करता, मला सांगायचे आहे की मी या चित्रपटाकडे का आकर्षित झालो. हा उच्च दर्जाचा भावनिक आणि प्रभावशाली चित्रपट आहे. त्याबद्दल अधिक काही सांगून मला तुमचा भ्रमनिरास करायचा नाहीये.
डोळे बंद करून विचार करा. आपण सर्वांनी जीवनात अशा प्रसंगांना तोंड दिले आहे, जेव्हा एका क्षणी आपल्याला असे वाटते की आपण खूप सामर्थ्यवान आहोत आणि दुसऱ्या क्षणी आपण असहाय्य आहोत. आपण सर्वांनी आपल्या आयुष्यात अशा क्षणांचा सामना केला आहे, जेव्हा आपल्याला वाटले की आपण जग जिंकू शकू, तर पुढच्याच क्षणी परिस्थितीने आपल्या मार्गात अतुलनीय अडथळे आणलेले असतात. ते वादळ तुमच्या आत आकार घेतंय, तुमच्या भावनांशी खेळतं आणि तुम्हाला तोडतं, प्रचंड चढ-उतारांचा तो खडतर प्रवास, तुम्ही स्वतःलाच प्रश्न विचारू लागता, हे वाईट स्वप्न आहे की खरंच सगळं घडतंय?
या सर्व भावना ‘रनवे ३४’ शी निगडीत आहेत. प्रचंड आनंदाचे क्षण, अत्यंत धोकादायक परिस्थिती, कमालीचा आनंद आणि निराशा या सर्व भावभावना चित्रपटाच्या पटकथेत सुंदरपणे गुंफल्या आहेत. खरं सांगायचे तर, ही संहिता मला सोडावीशी वाटली नाही. मला आंतरिकरित्या जाणवत होतं की मला हा चित्रपट कोणत्याही परिस्थितीत बनवायचाच आहे.