महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

रामचरणला दुखापत, 'आरआरआर'चे पुण्यातील चित्रीकरण ३ आठवडे लांबणीवर - pune

जिममध्ये व्यायाम करताना चित्रपटातील अभिनेता रामचरणला दुखापत झाली आहे. त्यामुळे, ३ आठवड्यांसाठी चित्रपटाचे शूटींग थांबवण्यात आले असल्याची माहिती चित्रपटाच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून देण्यात आली आहे

आरआरआरचे चित्रीकरण लांबणीवर

By

Published : Apr 4, 2019, 5:42 PM IST

मुंबई- दिग्दर्शक एस. एस. राजामौली यांच्या 'आर आर आर' सिनेमाची प्रेक्षक गेल्या अनेक दिवसांपासून आतुरतेने वाट पाहत आहेत. रामचरण आणि ज्युनिअर एनटीआर यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचलेली असतानाच आता चित्रपटाचे चित्रीकरण लांबणीवर पडले आहे.


होय, जिममध्ये व्यायाम करताना चित्रपटातील अभिनेता रामचरणला दुखापत झाली आहे. त्यामुळे, ३ आठवड्यांसाठी चित्रपटाचे शूटींग थांबवण्यात आले असल्याची माहिती चित्रपटाच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून देण्यात आली आहे. पुण्यात या चित्रपटाच्या शूटींगसाठी भव्य सेटदेखील उभारण्यात आला आहे. मात्र, या दरम्यानच रामचरणच्या टाचेला गंभीर दुखापत झाल्याने हे चित्रीकरण लांबणीवर पडले आहे.


विशेष म्हणजे या दाक्षिणात्य चित्रपटात आलिया भट्ट आणि अजय देवगणही महत्त्वाच्या भूमिका साकारणार आहेत. आलिया यात रामचरणच्या अपोझिट दिसणार असल्याचे म्हटले जात आहे. ३० जुलै २०२० ला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details