मुंबई - अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे पथक (एनसीबी) रिया चक्रवर्तीच्या घरी दाखल झाले होते. त्यानंतर तिला समन्स देत हे पथक परतले आहे. यावेळी इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिसेस (आयआरएस) अधिकारी समीर वानखेडेही उपस्थित होते. एनसीबीने याप्रकरणी सहकार्य करण्याचे आवाहन रियाला केल्याचे त्यांनी सांगितले.
यापूर्वी एनसीबीने सुशांतचा कर्मचारी दिपेश सावंतला अटक केली होती. यापूर्वी शुक्रवारी सुशांतची प्रेयसी अभिनेत्री रिया चक्रवर्तीचा भाऊ शोविक चक्रवर्ती आणि सॅम्युअल मिरांडा यांना एनसीबीने अटक केली होती.