महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

RRR Movie : अखेर ‘आरआरआर’ चित्रपट मार्च महिण्यात प्रदर्शित होणार - The movie 'RRR' will be released in March

‘बाहुबली’ नंतर दिग्दर्शक एस एस राजामौली (Director SS Rajamouli) यांच्या आगामी ‘आरआरआर’ या (RRR Movie) भव्यदिव्य चित्रपटाची प्रेक्षक वाट पाहत आहेत. कोरोनामुळे या चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले होते. ७ जानेवारीला तो प्रदर्शित होणार होता. त्यानुसार ठिक ठिकाणी प्रोमोशनही सुरु होते. परंतु कोरोनाची तिसरी लाट आली आणि पुन्हा एकदा ‘आरआरआर’ चे प्रदर्शन पुढे ढकलावे लागले. आता तो 25 मार्चला प्रदर्शित (The movie 'RRR' will be released in March) केला जाणार असल्याचे जाहिर करण्यात आले आहे.

‘RRR’ way of display
‘आरआरआर’ प्रदर्शनाचा मुहूर्त

By

Published : Feb 11, 2022, 4:06 PM IST

मुंबई:कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा फटका चित्रपटसृष्टीला बसला. वाढत्या रुग्णसंख्येमुळे चित्रपटगृहे बंद ठेवण्यात आली. त्यामुळे ‘आरआरआर’ च्या मेकर्सनी त्यांच्या चित्रपटाची प्रदर्शन तारीख ७ जानेवारीवरून बेमुदत पुढे ढकलली होती. काही दिवसांपूर्वी एस एस राजामौली यांनी दोन संभावित तारखा घोषित केल्या होत्या. त्यात १८ मार्च आणि २८ एप्रिल. या कोणत्याही दिवशी त्यांचा ‘आरआरआर’ प्रदर्शित होईल असे कळविण्यात आले होते.

जानेवारी २०२२ च्या तिसऱ्या आठवड्यात भारतातील तिसरी लाट आटोक्यात आल्याचे जाहीर करण्यात आले आणि चित्रपटनिर्माते पुन्हा एकदा आपापल्या चित्रपटांच्या प्रदर्शनाची जुळवाजुळव करू लागले. ‘आरआरआर’ च्या निर्मात्यांनी दोन प्रदर्शन तारखा आधीच जाहीर केलेल्या होत्या आणि आज त्यांनी आपला चित्रपट २५ मार्च रोजी प्रदर्शित होईल असे जाहीर केले आहे.

दिग्दर्शक एसएस राजामौली यांच्या 'आरआरआर' चित्रपटात ज्युनियर एनटीआर आणि राम चरण मुख्य भूमिकेत आहेत. ती तेलगू स्वातंत्र्यसैनिक अल्लुरी सीताराम राजू आणि कोमाराम भीम यांच्या जीवनावर आधारित एक काल्पनिक कथा आहे. ज्युनियर एनटीआर आणि राम चरण व्यतिरिक्त, 'आरआरआर' मध्ये आलिया भट्ट, अजय देवगण, समुथिरकानी, रे स्टीव्हन्सन, ऑलिव्हिया मॉरिस आणि ॲलिसन डूडी यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details