मुंबई- बॉलिवूड अभिनेता अनुपम खेर यांचा बहुप्रतिक्षित 'द काश्मीर फाइल्स' या चित्रपटाचा ट्रेलर सोमवारी (21 फेब्रुवारी) रिलीज झाला आहे. अनुपम यांनी रविवारी सोशल मीडियावर चित्रपटाचे पोस्टर शेअर करून चित्रपटाचा ट्रेलर आणि रिलीजची तारीख जाहीर केली होती. या चित्रपटाचा ट्रेलर सोमवारी (२१ फेब्रुवारी) सकाळी ११ वाजता प्रदर्शित होणार असल्याचे अभिनेत्याने सांगितले होते. 'द कश्मीर फाइल्स' हा चित्रपट 11 मार्च रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.
चित्रपटाचा ट्रेलर 3:30 मिनिटांचा असून तो अतिशय प्रेक्षणीय आहे. ट्रेलरमध्ये मिथुन चक्रवर्ती, दर्शन कुमार, पल्लवी जोशी आणि अनुपम खेर या कलाकारांनी आपला उत्तम अभिनय सादर केला आहे.
यापूर्वी अनुपम खेर यांनी चाहत्यांना त्यांच्या इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाऊंटवर माहिती दिली होती की, चित्रपटाचा ट्रेलर 21 फेब्रुवारीला आणि चित्रपट 11 मार्चला चित्रपटगृहात दाखल होणार आहे. ही पोस्ट शेअर करत अनुपम खेर यांनी लिहिले, 'विवेक अग्निहोत्रीच्या मॅग्नम ओपस चित्रपटाचे सर्व फोटो शेअर करत आहे. मोस्ट अवेटेड चित्रपटाचा ट्रेलर उद्या म्हणजेच सोमवारी सकाळी ११ वाजता 'द काश्मीर फाइल्स, जय माता खीर भवानी' प्रदर्शित होणार आहे.