मुंबई - विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित 'द काश्मीर फाईल्स' बॉक्स ऑफिसवर अविरत कमाई करत आहे. अनुपम खेर मुख्य भूमिकेत असलेल्या या चित्रपटाने रिलीजच्या पाचव्या दिवशी 18 कोटींची कमाई करून 50 कोटी क्लबमध्ये प्रवेश केला आहे.
भारतीय चित्रपट समीक्षक आणि व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन शेअर केले आहे. पहिल्या दिवशी ३.५५ कोटी रुपयांची कमाई करणाऱ्या या चित्रपटाने शनिवारी ८.५० कोटी रुपयांची कमाई केली. रविवारी आणि सोमवारी या चित्रपटाने अनुक्रमे 15.10 कोटी आणि 15.05 कोटी रुपयांची कमाई करत आणखी उच्चांक नोंदवला.
मंगळवारी चित्रपटाने 18 कोटी रुपयांची कमाई केली आणि त्याची एकूण कमाई 60.20 कोटी रुपये झाली. आठवड्याच्या दिवसातील या दुहेरी अंकी आकड्याने मागील बॉलिवूड चित्रपटांनी तयार केलेले महामारीनंतरचे बॉक्स ऑफिसवरील विक्रम मोडले आहेत.