मुंबई - चित्रपट निर्माता विवेक अग्निहोत्रीचा नुकताच रिलीज झालेला द काश्मीर फाइल्स बॉक्स ऑफिसवर वादळ निर्माण करीत आहे. ट्रेड रिपोर्ट्सनुसार, अक्षय कुमारचा बच्चन पांडे रिलीज होऊनही हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जोरदार चालत आहे. रिलीजच्या 8 व्या दिवशी द काश्मीर फाइल्स ( The Kashmir Files ) ने इतिहास रचला आहे कारण चित्रपटाचा व्यवसाय बाहुबली 2 च्या बरोबरीने आहे.
व्यापार तज्ज्ञ तरण आदर्श यांनी काश्मीर फाइल्स बॉक्स ऑफिस रिपोर्टवर नवीन अपडेट शेअर केले आहे. त्यांच्या ट्विटर हँडलवर तरणने लिहिले, "द काश्मीर फाइल्सने इतिहास घडवला... रिलीजच्या आठव्या दिवशी चित्रपटाने १९.१५ कोटीचा व्यवसाय केला. बाहुबली २ चित्रपटाने आठव्या दिवशी १९.७५ कोटी कमावले होते तर दंगल चित्रपटाचा व्यवसाय १८.५९ कोटी इतका होता. द काश्मीर फाईल चित्रपट आता ऑल टाईम ब्लॉकबस्टर चित्रपटांच्या यादीत समाविष्ठ झाला आहे. चित्रपटाची एकूण कमाई ११६.४५ कोटी इतकी झाली आहे.''