'तेजाब' चित्रपटातील 'सो गया ये जहाँ' हे लोकप्रिय गाणे पुन्हा एकदा नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीस आले आहे. 'बायपास रोड' या आगामी चित्रपटात हे गाणे नव्या स्वरुपात पाहायला मिळणार आहे. या गाण्याची एक झलक प्रेक्षकांसाठी प्रसिध्द झाली आहे.
पाहा, 'बायपास रोड'मधील 'सो गया ये जहाँ'ची पहिली झलक - The iconic song from Tezaab - So Gaya Yeh Jahan
'सो गया ये जहाँ' हे तेजाब चित्रपटातील गाणे बापास रोडसाठी रिक्रिएट करण्यात आलंय. याची पहिली झलक प्रसिध्द झाली आहे.
'बायपास रोड' चित्रपटात हे गाणे नील नितीन मुकेशवर चित्रीत करण्यात आले आहे. हे नव्या स्वरुपातील गाणे झुबिन नौटियाल यांनी गायले असून तेजाब चित्रपटातील मुळ गाणे नितीन मुकेश यांनी गायले होते. १९८८ मध्ये हे गाणे खूप गाजले होते. लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी संगीतबध्द केलेले हे मुळ गाणे अलका याज्ञिक, शब्बीर कुमार आणि नितीन मुकेश यांनी गायले होते.
'बायपास रोड' हा आगामी चित्रपट नमन नितीन मुकेश यांनी दिग्दर्शित केलाय. १ नोव्हेंबरला हा चित्रपट भारतभर प्रदर्शित होईल.