अभिनेता कार्तिक आर्यनच्या चाहत्यांसाठी एक खूशखबर आहे. हंसल मेहता दिग्दर्शन करीत असलेल्या कॅप्टन इंडिया या चित्रपटाची घोषणा करण्यात आली असून यात मुख्य भूमिका कार्तिक आर्यन साकारणार आहे. या चित्रपटाचे पहिले पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. 'अॅन ऑर्डेनरी मॅन, अॅन एक्स्ट्रऑर्डेनरी मिशन' अशी पोस्टवर बाय लाईन देण्यात आली आहे.
आरएसव्हीपी आणि बावेजा स्टुडिओची निर्मिती असलेल्या या सिनेमात कार्तिक आर्यन पायलटची भूमिका साकारताना दिसणार आहे. रॉनी स्क्रूवाला आणि हरमन बावेजा या चित्रपटाचे निर्माते असतील. ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी कॅप्टन इंडियाचे पहिले पोस्टर ट्विटरवर शेअर केले आहे.