महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

'कबीर सिंग'च्या या डायलॉगची सोशल मीडियावर धमाल, मीम्स व्हायरल - trailer

काही दिवसांपूर्वीच 'कबीर सिंग' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. यातील एका डायलॉगने सोशल मीडियावर धुमाकुळ घातला आहे. शाहिदच्या 'नहीं आऊँगा मतलब नहीं आऊँगा, बोला ना नहीं आऊँगा'..या डायलॉगवर अनेक मीम्स सध्या व्हायरल होत आहेत.

'कबीर सिंग'च्या डायलॉगची सोशल मीडियावर धमाल

By

Published : May 15, 2019, 2:24 PM IST

मुंबई- शाहिद कपूरची मुख्य भूमिका असलेला 'कबीर सिंग' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. हा ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलाच मात्र यासोबतच चित्रपटातील डायलॉगनेही सोशल मीडियावर धुमाकुळ घातला.

शाहिदच्या 'नहीं आऊँगा मतलब नहीं आऊँगा, बोला ना नहीं आऊँगा'..या डायलॉगवर अनेक मीम्स सध्या व्हायरल होत आहेत. अनेकांनी माझं डोकं परिक्षेच्या वेळी एखाद्या प्रश्नाचं उत्तर आठवताना अगदी असंच म्हणत असल्याचं म्हटलं आहे. तर काहींनी याला निवडणूकांचासंदर्भ देत २३ मे रोजी काँग्रेस भाजपला असेच म्हणणार असल्याचे म्हटले आहे.

तर एकाने टायगर श्रॉफच्या 'स्टुंडट ऑफ द ईअर २' चित्रपटाची खिल्ली उडवत, जेव्हा माझे सर्व मित्र हा चित्रपट पाहायला निघालेत आणि मी आधीच चित्रपटाचा रिव्ह्यू वाचाला आहे, असं लिहिलं आहे. 'कबीर सिंग' हा दाक्षिणात्य 'अर्जून रेड्डी' चित्रपटाचा रिमेक असणार आहे. यात कियारा अडवाणीदेखील मुख्य भूमिकेत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details