महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

‘द बिग बुल’ ट्रेलर : भारताचा पहिला अब्जाधिश बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणाची कथा - इनसाइडर ट्रेडिंग

अभिषेक बच्चनने ट्विटरवर आपल्या आगामी ‘द बिग बुल’ या चित्रपटाचा ट्रेलर शेअर केला आहे. १९८७ मध्ये मुंबईच्या पार्श्वभूमीवर शेअर मार्केटमध्ये गुप्त माहितीच्या जोरावर नफा कमावून 'इनसाइडर ट्रेडिंग' कमवणाऱ्या हेमंतची कथा यात दाखवण्यात आली आहे. हा चित्रपट ८ एप्रिल २०२१ रोजी हॉटस्टारवर रिलीज होणार आहे.

The Big Bull trailer
‘द बिग बुल’ ट्रेलर

By

Published : Mar 19, 2021, 1:08 PM IST

Updated : Mar 19, 2021, 4:01 PM IST

मुंबई - आपल्या आगामी 'द बिग बुल' चित्रपटाचा टीझर शेअर करुन प्रेक्षकांच्या उत्सुकता वाढवल्यानंतर अभिषेक बच्चनने चित्रपटाचा ट्रेलर रिलीज केला आहे. भारताच्या अर्थव्यवस्थेला हादरवून टाकणाऱया धक्कादायक घोटाळ्यावर प्रेरित झालेली कथा या चित्रपटात दाखवण्यात आली आहे.

तीन मिनीट ८ सेकंदाच्या ट्रेलरची सुरूवात व्हाइस ओव्हरने होते. "या देशात आपण काहीही करु शकतो. नकली प्रमोटर्स वापरु शकतो, पोलिसांना लाच देऊ शकतो, मीडियाला धमकवू शकतो, लोकांना खरेदी करु शकतो, काहीही करु शकतो. बस्स फक्त एक नियम आहे, सापडले नाही पाहिजे." यात अभिषेक बच्चन हेमंत शाह ही व्यक्तीरेखा साकारत असून तो टॅक्सी करुन बँकेत येतो आणि खोटी कागदपत्रे देऊन बँक ऑफिसरला लाच देऊन पटवताना दिसतो.

ट्रेलरमध्ये हेमंतची कथा १९८७मधील मुंबई शहराच्या पार्श्वभूमीवर सेट केली गेली आहे. यात तो शेअर बाजाराचा व्यापारी बनला आहे आणि गुप्त माहिती जमा करतो ज्यामुळे तो त्याच्या बाजारपेठेतील व्यापारात मदत करतो. अखेरीस नफा कमावून तो 'इनसाइडर ट्रेडिंग' करतो.

'स्टॉक मार्केट'मधील सर्वात मोठा व्यवसायिक म्हणून हेमंतला ओळखले जाते. त्यानंतर त्याला व्यवसाय वाढीसाठी राजकारण्यांचे सहकार्य मिळते. सर्व भल्या बुऱ्या मार्गाचा वापर करीत तो भारतातील पहिला अब्जाधिश बनण्याचे स्वप्न बाळगून असतो, याची झलक ट्रेलरमध्ये पाहायला मिळते.

अभिषेकने ट्विट केला ‘द बिग बुल’ ट्रेलर

कोकी गुलाटी दिग्दर्शित 'द बिग बुल' या चित्रपटात इलियाना डिक्रूझ, निकिता दत्ता, सुमित वॅट्स, राम कपूर, सोहम शाह यांच्यासह अनेक कलाकार आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर आज 19 मार्च रोजी रिलीज झाला आहे. हा चित्रपट ८ एप्रिल २०२१ रोजी हॉटस्टारवर रिलीज होणार आहे.

हेही वाचा - महिला फाटक्या जीन्स घालतात, मुलांना काय संस्कार देणार, भाजपाच्या मुख्यमंत्र्याची मुक्ताफळे

Last Updated : Mar 19, 2021, 4:01 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details