मुंबई - २०२० च्या आयफा पुरस्कार सोहळ्याची घोषणा सलमान खानने मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या उपस्थितीत भोपाळमध्ये केली. यंदाचा २१ वा आयफा पुरस्कार सोहळा इंदुरमध्ये २७ ते २९ मार्चला पार पडणार आहे. ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी ट्विट करीत ही बातमी दिली आहे.
इंदुरमध्ये २७ ते २९ मार्चला रंगणार २१ वा आयफा सोहळा - २७ ते २९ मार्चला रंगणार २१ वा आयफा सोहळा
२१ वा आयफा पुरस्कार सोहळा यावेळी मध्य प्रदेशच्या इंदुर शहरात रंगणार आहे. या शोचे सूत्रसंचालन सलमान खान आणि रितेश देशमुख करणार आहेत.
![इंदुरमध्ये २७ ते २९ मार्चला रंगणार २१ वा आयफा सोहळा 21st edition of IIFA Awards](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-5957564-thumbnail-3x2-oo.jpg)
२१ वा आयफा सोहळा
आयफाचा हा रंगतदार सोहळा बॉलिवूडच्या दिग्गज कलाकारांच्या उपस्थितीत आणि बहुढंगी परफॉर्मन्सने सजवण्यात आला आहे. या शोचे सूत्रसंचालन सलमान खान आणि रितेश देशमुख करणार आहेत.
या सोहळ्यात यात जॅकलिन फर्नांडिससह कॅटरिना कैफही गाण्यावर थिरकताना दिसेल. अरजित सिंग, जोनिता गांधी, शाल्मली खोलगडे, बेनी दयाल, जुबिन नौटियाल अशा अनेकांचे यावेळी परफॉर्मन्स होणार आहेत.
Last Updated : Feb 4, 2020, 11:03 PM IST