मुंबई - ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेता अनिल कपूर यांनी २०२० च्या शेवटच्या दिवशी आपल्या भावना शेअर करताना सांगितले की, "या वर्षी जिवंत राहिल्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त करतो. यावर्षी कोरोना विषाणूने संपूर्ण जग हादरले. बॉलिवूडमधील अनेक बड्या व्यक्तिरेखा या जगापासून दूर गेल्या."
६४ वर्षीय अनिल कपूर यांनी इंस्टाग्रामवर लिहिले, "२०२० .. पुढे जाण्याचे एक वर्ष, नवीन स्वप्ने, कठीण काळ आणि बरेच काही .. माझ्या जवळ जे आहेत त्या सर्वांचा मी आभारी आहे आणि मी जीवंत आहे त्याबद्दलही आभारी आहे. माझे कुटुंब आणि टीमचा पाठिंबा आणि प्रेमाने मी वेढलेलो आहे."