मुंबई - ग्लोबल आयकॉन प्रियंका चोप्रा सध्या लंडनमध्ये सिटाडेल या आंतरराष्ट्रीय सिरीजचे शुटिंग करीत आहे. तिने रोमँटिक ड्रामा असलेल्या 'टेक्स्ट फॉर यू' आणि 'मॅट्रिक्स रिबूट'साठी कोविडच्या भीतीदरम्यान शूट केले. साथीच्या धोक्यादरम्यान सेटवर परतताना काय वाटले हे प्रियंकाने शेअर केले आहे. एका मासिकाला दिलेल्या ताज्या मुलाखतीत प्रियंका म्हणाली की तिने पती निक जोनाससोबत घरी वेळेचा आनंद घेतला पण जेव्हा या स्थितीचा अंतच होत नव्हता तेव्हा मात्र तिला परिस्थितीचे गांभीर्य समजले.
सेटवर परत गेल्यावर काय वाटले हे सांगताना प्रियांका म्हणाली, "मी सहा महिने घरी माझ्या कुटुंबासोबत खरोखर सुरक्षित वेळ घालवला आणि त्यानंतर मी जर्मनीला कामासाठी बाहेर पडले. मी विमानात रडत होते. मी घाबरले होते."
परंतु कोविडचे सर्व प्रोटोकॉल सेटवर पाळले जात असल्यामुळे तिचा जीव भांड्यात पडला. त्यानंतर लंडनमध्ये 'टेक्स्ट फॉर यू'च्या सेटवर जास्तच काळजी घेतली गेल्याचेही ती म्हणाली.