महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

सूर अन् भावनांचा मिलाफ, राणू मंडल यांच्या आवाजातील पहिलं गाणं प्रदर्शित - तेरी मेरी कहानी

सुर आणि भावनांचा मिलाफ असलेलं हे गाणं अनेकांच्या चांगलंच पसंतीस उतरत आहे. प्रदर्शनानंतर दुसऱ्याच दिवशी तेरी मेरी कहानी हे राणू मंडलच्या आवाजातील गाणं इंटरनेटवर ट्रेंडिंग करत आहे.

राणू मंडलच्या आवाजातील पहिलं गाणं प्रदर्शित

By

Published : Sep 12, 2019, 8:28 AM IST

मुंबई- काही दिवसांपासून इंटरनेटवर राणू मंडल हे नाव बरंच चर्चेत आहे. रेल्वे स्टेशनवर गाणं गाणाऱ्या या महिलेचा चित्रपटातील गाण्याला आवाज देण्यापर्यंतचा प्रवास थक्क करणारा आहे. याच राणू यांना हिमेश रेशमियानं आपल्या चित्रपटातील एक गाणं गाण्याची संधी दिली. राणू यांच्या आवाजातील हे गाणं ऐकण्यासाठी अनेकजण उत्सुक असतानाच आता हे गाणं प्रदर्शित करण्यात आलं आहे.

विशेष म्हणजे सुर आणि भावनांचा मिलाफ असलेलं हे गाणं अनेकांच्या चांगलंच पसंतीस उतरत आहे. प्रदर्शनानंतर दुसऱ्याच दिवशी तेरी मेरी कहानी हे राणू मंडलच्या आवाजातील गाणं इंटरनेटवर ट्रेंडिंग करत आहे. तर केवळ १७ तासात या गाण्याला ३ कोटींहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

या गाण्याला राणू यांच्यासोबतच हिमेशनेदेखील आवाज दिला आहे. हिमेशच्याच हॅपी हार्डी अॅण्ड हीर सिनेमातील हे गाणं असून यात हिमेश आणि सोनियाची भावनिक टच असलेली लव्ह स्टोरी पाहायला मिळत आहे. हे बहुप्रतीक्षीत गाणं प्रेक्षकांची मनं जिंकण्यास यशस्वी ठरलं आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details