मुंबई - 'गंगूबाई काठियावाडी' या चित्रपटाची निर्मिती हिंदीत झालेली असली तरी हा चित्रपट दाक्षिणात्य भाषांमधूनही रिलीज करण्यात येणार आहे. याची सुरूवात तेलुगु भाषेपासून झाली आहे. अभिनेत्री आलिया भट्टने एका व्हिडिओ आवानाच्या माध्यमातून हा चित्रपटाचा टिझर रिलीज होणार असल्याचे सांगितले आहे.
'गंगूबाई काठियावाडी' या चित्रपटाचा तेलुगु टिझर दाक्षिणात्य पॉवर स्टार अशी ओळख असलेल्या पवन कल्याणच्या 'वकिल साब' या चित्रपटाच्या रिलीजपासून होणार आहे. 'वकिल साब' हा चित्रपट शुक्रवारी ९ एप्रिल रोजी सर्वत्र रिलीज होणार आहे. या चित्रपटाच्यावेळी 'गंगूबाई काठियावाडी'चा तेलुगु टिझर रिलीज होईल.
हेही वाचा - पवन कल्याणने 'वकिल साब'चे शुटिंग केले पूर्ण