महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

तेलंगणाचे मंत्री केटीआर म्हणतात, "मी नाही सोनू सूदच 'खरा सुपरहिरो'" - केटीआरने सोनू सूदला सुपरहीरो म्हटले

तेलंगणाचे नगरपालिका प्रशासन आणि नगरविकास मंत्री के.टी. रामाराव यांनी अभिनेता सोनू सदला खरा सुपरहिरो म्हटले आहे. ज्याने वैद्यकीय साहित्य, ऑक्सिजन सिलेंडर्स आणि कॉन्सन्टेटर्स आणि हॉस्पिटलमध्ये बेड मिळण्यासाठी सोनू सूदचे काम करीत आहे त्यामुळे केटीआर यांचे लक्ष त्याने वेधून घेतले आहे.

KTR called Sonu Sood a superhero
केटीआरने सोनू सूदला सुपरहीरो म्हटले

By

Published : Jun 1, 2021, 4:53 PM IST

हैदराबाद - तेलंगणा राज्याचे मंत्री केटीआरने नुकत्याच केलेल्या ट्विटमध्ये सोनू सूदला सुपरहीरो म्हटले आहे. सोनू यांनी केटीआर यांचे आभार मानले आणि या गरजेच्या वेळी मंत्री तेलंगणाच्या जनतेला कशी मदत करीत आहेत हेही नमूद केले. केटीआर यांच्या कौतुकामुळे सोनू सूद भावूक झाला आहे.

कोविड -१९च्या संकटकाळात असे अनेक सेलिब्रिटी आले ज्यांनी वैद्यकीय मदतीची गरज असलेल्यांना मदत केली. सोनू सूदही असाच एक प्रतिष्ठित व्यक्ती आहेत, ज्याने वैद्यकीय साहित्य, ऑक्सिजन सिलेंडर्स आणि कॉन्सन्टेटर्स आणि हॉस्पिटलमध्ये बेड मिळण्यासाठी लोकांना सतत मदत केली आहे. सोनूच्या या निस्वार्थी काम तेलंगणाचे नगरपालिका प्रशासन आणि नगरविकास मंत्री के.टी. रामाराव यांचे लक्ष वेधणारे ठरले आहे.

नुकतीच केटीआर यांची मदत मिळालेल्या एका व्यक्तीने त्यांचे ट्विटरवर आभार मानले.

त्या व्यक्तीने मित्राच्या वडिलांसाठी ऑक्सिजन सिलिंडरची विनंती केली होती जी दहा तासांच्या आत त्याला देण्यात आली. ट्विटर युजरने केटीआर यांना “खरे सुपरहीरो” म्हटले आणि लिहिले की, “ मी केटीआर साहेबांचे अधिक आभार मानू शकत नाही. आम्ही विनंती केल्या नंतर १० तासांच्या आत ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर उपलब्ध झाले. तुम्ही आत्तापर्यंत बर्‍याच जणांना मदत केली आणि तेलंगणातील लोकांना तुम्ही जी सतत मदत करीत आहात ती कधीही विसरण्यासारखी नाही. आणि मला हे आज म्हणयचंय, की तुम्ही 'खरे सुपरहिरो' आहात."

या ट्विटला उत्तर देताना के.टी. रामाराव यांनी लिहिले, की 'लोकांचे दुखणे कमी करण्यासाठी आम्ही फक्त आपले काम करत आहोत. तथापि, सोनू सूद यांनाच “सुपरहीरो” म्हटले पाहिजे. “मी एक निवडलेला प्रतिनिधी म्हणून माझ्या वाट्याचे काम करीत आहे. तुम्ही सोनू सूदला 'खरा सुपरहिरो' म्हणू शकता. तसेच, संकटात सापडलेल्यांची मदत करण्याची मी विनंती करीत आहे."असे त्यांनी लिहिले.

तेलंगणाच्या मंत्र्यांच्या या दयाळू शब्दांनी सोनू सूद सद्गदित झाला आहे. सोनूने केटीआर यांनी कौतुक केले म्हणून त्यांचे आभार मानले आहेत. ''आपल्या दयाळू शब्दांबद्दल सरांचे आभार! परंतु आपण खरोखरच एक नायक आहात, तुम्ही तेलंगणासाठी बरेच काही केले आहे. तुमच्या नेतृत्वाखाली राज्यात इतका विकास झाला आहे. माझ्यासाठी तेलंगणा हे दुसरे घरच आहे. हे माझे कामाचे ठिकाण आहे आणि वर्षभरापासून इथल्या लोकांनी माझ्यावर खूप प्रेम केले आहे.", असे सोनूने आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय.

हेही वाचा - HBD आर माधवन : ''माझ्या एकतर्फी दुश्मनाला हॅप्पी बड्डे आणि लै लै लव''

ABOUT THE AUTHOR

...view details