मुंबई- २०१३ मध्ये आलेल्या 'स्टूडंट ऑफ द इअर' चित्रपटाला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यवर घेतलं. या चित्रपटातून वरूण धवन, आलिया भट्ट आणि सिद्धार्थ मल्होत्रा या कलाकारांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. यानंतर आता चित्रपटाचा दुसरा भाग म्हणजेच 'स्टूडंट ऑफ द इअर २' प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
विशेष म्हणजे या चित्रपटातूनही दोन नवे चेहरे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. यात टायगर श्रॉफ, तारा सुतारिया आणि अनन्या पांडे या कलाकारांच्या मुख्य भूमिका असणार आहेत. चित्रपटाचं टीझर पोस्टर नुकतंच प्रदर्शित करण्यात आलं आहे. मात्र, या पोस्टमध्ये कलाकारांचे लूक पाहायला मिळत नाही. तर याशिवाय टायगरने आपला चित्रपटातील एक फोटोही शेअर केला आहे. ज्यात तो पाठमोरा उभा आहे.
यासोबतच चित्रपटाच्या ट्रेलरबद्दलही माहिती देण्यात आली आहे. येत्या १२ तारखेला सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे, प्रेक्षकांची प्रतिक्षा आता संपली आहे. पुनित मल्होत्रा यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. तर हिरू जोहर आणि करण जोहर यांची निर्मिती आहे. मे महिन्यात १० तारखेला चित्रपट प्रदर्शित होणार आहे.