मुंबई- काही दिवसांपासून इंटरनेटवर राणू मंडल हे नाव बरंच चर्चेत आहे. रेल्वे स्टेशनवर गाणं गाणाऱ्या या महिलेचा चित्रपटातील गाण्याला आवाज देण्यापर्यंतचा प्रवास थक्क करणारा आहे. याच राणू यांना हिमेश रेशमियानं आपल्या चित्रपटातील एक गाणं गाण्याची संधी दिली. राणू यांच्या आवाजातील हे गाणं ऐकण्यासाठी अनेकजण उत्सुक असतानाच आता याचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे.
राणू मंडलच्या आवाजातील पहिलं गाणं, हिमेशनं शेअर केला टीझर - हॅपी हार्डी अॅण्ड हिर
हिमेश रेशमियाने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन तेरी मेरी कहाणी या राणू मंडल यांच्या आवाजातील गाण्याचा टीझर शेअर केला आहे. आज मुंबईमध्ये एका इव्हेंटमध्ये हे संपूर्ण गाणं प्रदर्शित करण्यात येणार आहे.
हिमेश रेशमियाने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन तेरी मेरी कहाणी या राणू मंडल यांच्या आवाजातील गाण्याचा टीझर शेअर केला आहे. आज मुंबईमध्ये एका इव्हेंटमध्ये हे संपूर्ण गाणं प्रदर्शित करण्यात येणार आहे. हिमेशच्याच आगामी 'हॅप्पी, हार्डी अँड हिर' या सिनेमातील हे गाणं आहे.
दरम्यान हॅपी हार्डी अॅण्ड हिर सिनेमा एक लव्ह स्टोरी असणार आहे. या चित्रपटात हिमेश डबल रोल साकारणार आहे. राका यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. तर दिपशिखा देशमुख आणि सबीता मानकचंद यांनी सिनेमाची निर्मिती केली आहे. आता राणू यांच्या आवाजातील हे संपूर्ण गाणं ऐकण्यासाठी श्रोतेही उत्सुक आहेत.