मुंबई- नेटफ्लिक्सच्या निर्मात्यांनी नुकताच आपल्या अधिकृत अकाऊंटवरून सेक्रेड गेम्स २ या क्राईम थ्रिलर सीरिजचा टीझर शेअर केला आहे. २६ सेकंदांचा हा टीझर शेअर करत या खेळाचा खरा बाप कोण? असे कॅप्शन या व्हिडिओला देण्यात आले आहे.
'सेक्रेड गेम्स २'चा टीझर प्रदर्शित, झळकणार 'हे' नवे कलाकार - nawazuddin
प्रेक्षक या सीरीजची आतुरतेने वाट पाहत असतानाच नोव्हेंबरमध्ये सीरिजच्या चित्रीकरणाला सुरूवात झाली. विक्रम चंद्रा यांच्या ‘सेक्रेड गेम्स’ या कांदबरीवर या वेब सिरीजचे कथानक आधारित आहे
या टीझरमध्ये सैफ अली खान, नवाजुद्दीन सिद्दीकी, कल्की कोचलिन आणि पंकज त्रिपाठीसारख्या कलाकारांच्या भूमिका पाहायला मिळत आहेत. दुसऱ्या पर्वामध्ये अभिनेत्री कल्की कोचलीन आणि अभिनेता रणवीर शौरी हे दोन नवीन कलाकार दिसणार आहेत.
प्रेक्षक या सीरीजची आतुरतेने वाट पाहत असतानाच नोव्हेंबरमध्ये सीरिजच्या चित्रीकरणाला सुरूवात झाली. विक्रम चंद्रा यांच्या ‘सेक्रेड गेम्स’ या कांदबरीवर या वेब सिरीजचे कथानक आधारित आहे. अनुराग कश्यप आणि विक्रमादित्य मोटावणी यांनी सेक्रेड गेम्सच्या पहिल्या सीरिजचे दिग्दर्शन केले आहे.