मुंबई- अजय देवगण आणि तब्बूची जोडी लवकरच 'दे दे प्यार दे' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटात अजय आणि तब्बूशिवाय रकुलप्रीतही महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. प्रेमाचा नेहमीपेक्षा काहीसा वेगळा त्रिकोण असलेल्या या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.
'दे दे प्यार दे'मधील 'चले आना' गाणं प्रदर्शित - ajay devgan
या चित्रपटात अजय आशिष नावाच्या ५० वर्षांच्या व्यक्तीचं पात्र साकारत आहे. तर रकुल आयशा नावाचं २६ वर्षाच्या तरूणीचं पात्र साकारत आहे. जी आशिषची गर्लफ्रेंड आहे.
!['दे दे प्यार दे'मधील 'चले आना' गाणं प्रदर्शित](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-3167188-thumbnail-3x2-rakul.jpg)
या चित्रपटातील आतापर्यंत प्रदर्शित झालेल्या गाण्यांनाही प्रेक्षकांची पसंती मिळाली. आता या चित्रपटातील आणखी एक गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. चले आना असे या गाण्याचे शीर्षक आहे. तब्बूने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर गाण्याचा टीझर शेअर करत याबद्दलची माहिती दिली होती. तर आता अजयने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून हे गाणं शेअर केलं आहे. नात्यात आलेल्या दुराव्यावर चित्रीत केलं गेलंल हे एक भावनिक गाणं आहे.
या गाण्याला अरमान मलिकने आपल्या आवाजाने अधिक खास बनवलं आहे. दरम्यान चित्रपटात अजय आशिष नावाच्या ५० वर्षांच्या व्यक्तीचं पात्र साकारत आहे. तर रकुल आयशा नावाचं २६ वर्षाच्या तरूणीचं पात्र साकारत आहे. जी आशिषची गर्लफ्रेंड आहे. तर तब्बू अजयच्या पूर्वाश्रमीच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहे. येत्या १७ मे ला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज झाला आहे.