महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

'पल पल दिल के पास', साहसी प्रेमकथेचा टीझर प्रदर्शित - टीझर

पल पल दिल के पास असं या चित्रपटाचं शीर्षक आहे. सहर बम्बा हीदेखील या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. सिनेमाच्या टीझरमध्ये करण आणि सहरच्या प्रेमाची खास झलक पाहायला मिळत आहे.

साहसी प्रेमकथेचा टीझर प्रदर्शित

By

Published : Aug 5, 2019, 12:05 PM IST

मुंबई- बॉलिवूडमध्ये गेल्या काही दिवसांपासून अनेक नवे चेहरे आणि स्टारकिड्स पदार्पण करताना दिसत आहेत. या यादीत आता आणखी दोन नावांचा समावेश झाला आहे. सनी देओलचा मुलगा करण देओल आपल्या पहिल्या चित्रपटासाठी सज्ज झाला असून त्याच्या पहिल्या सिनेमाचा टीझर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे.

पल पल दिल के पास असं या चित्रपटाचं शीर्षक आहे. सहर बम्बा हीदेखील या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. सिनेमाच्या टीझरमध्ये करण आणि सहरच्या प्रेमाची खास झलक पाहायला मिळत आहेत. यासोबतच कॅमेरा अँगल आणि मनमोहक लोकेशन प्रेक्षकांची मनं जिंकणारी आहेत.

या सिनेमाचं दिग्दर्शन सनी देओलनंच केलं आहे, तर झी स्टुडिओ आणि सनी साऊंड्स प्रायव्हेट लिमिटेड यांची संयुक्त निर्मिती आहे. 'पल पल दिल के पास' हा चित्रपट २० सप्टेंबर २०१९ ला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आता या नवोदित जोडीला प्रेक्षकांची पसंती मिळते का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details