मुंबई - अभिनेत्री कंगना रनौतच्या सोशल मीडिया टीमने एक अनोखा फोटो शेअर केला आहे. 2019मध्ये आलेल्या 'मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी' या चित्रपटातील कंगनाच्या व्यक्तीरेखेची बाहुली डिझाईन करण्यात आली आहे. हा फोटो शेअर करुन कंगनाच्या चाहत्यांना खूश करण्याचा प्रयत्न तिच्या टीमने केलाय.
चित्रपटात कंगनाच्या लूकपासून प्रेरित होऊन मणिकर्णिका बाहुलीला साडी आणि पारंपरिक भारतीय दागिन्यांनी सजवण्यात आले आहे. ट्विटरवर फोटो शेअर करताना टीम कंगना रनौत यांनी लिहिलंय: "# मणिकर्णिका बाहुल्या मुलांसाठी नवीन आहेत. यामुळे मुले आपल्या नायकांबद्दल शिकतील आणि पराक्रम आणि देशभक्तीची प्रेरणा घेतील."
'मणिकर्णिका : 'क्वीन ऑफ झांसी' गेल्या वर्षी 25 जानेवारीला प्रदर्शित झाला. 33 वर्षीय कंगनाने या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली होती. दिग्दर्शकाच्या भूमिकेतही या चित्रपटाने तिची ओळख निर्माण केली होती. या चित्रपटाद्वारे दिग्दर्शनात पदार्पण केल्यानंतर कंगनाने तिच्या प्रॉडक्शन हाऊसचे नाव मणिकर्णिका फिल्म्सही ठेवले आहे.
हेही वाचा - तापसू पन्नूचा 'लूप लपेता' ठरणार कोरोना विमा संरक्षण लाभलेला पहिला चित्रपट
इतर बातम्यांमध्ये कंगना आणि पूजा भट्ट यांच्यामधील ट्विटरवरील चकमक चर्चेचा विषय बनला आहे. वेगळ्या ट्विटमध्ये कंगनाच्या टीमने पूजा भट्टच्या ट्विटला प्रत्युत्तर दिले आहे. इंडस्ट्री बाहेरील कलाकार चित्रपटसृष्टीत योग्य वागणुकीसाठी पात्र असल्याचे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. तथापि, भट्ट कॅम्पने बॉलिवूडमध्ये कंगनाला त्यांच्या गँगस्टर या चित्रपटाद्वारे पहिला ब्रेक दिला होता, हेही तिने स्पष्ट केले आहे. तत्पूर्वी, कंगना रनौतच्या सोशल मीडिया टीमने दिग्दर्शक महेश भट्ट यांच्यावर चप्पल फेकून मारल्याचा आणि अपमान केल्याचा आरोप केला होता.